पालकमंत्री नीतेश राणे यांनी स्वतः कणकवली शहरातील घेवारी नामक मटका बुकी अड्ड्यावर गुरुवारी दुपारी चार वाजता छापा टाकला होता. यावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मंत्री झाल्यानंतर नितेश राणे यांना हप्ता मिळायचा बंद झाल्याने त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला, अशी टीका शरद कोळी यांनी आज रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत दिली आहे.