धक्कादायक! मालेगाव टेहरे फाटा गिरणा नदीत पित्याने टाकलं लेकरू; स्थानिक हिरोंनी वाचवले जीव Anc: मालेगाव हादरलं… टेहरे फाटा गिरणा नदी पुलावर हृदयद्रावक घटना! कौटुंबिक वादातून पित्याने आपल्या चार वर्षांच्या मुलीला उसळत्या नदीत फेकलं आणि स्वतःही उडी घेतली. क्षणभरात दोघांचे जीव धोक्यात, मात्र स्थानिक युवक देवदूत ठरले. जीवाची पर्वा न करता उडी मारून वडील आणि मुलीला वाचवलं. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.