महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हा कायदा जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारा असून त्यामुळे संवैधानिक हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत, जनसुरक्षा विधेयक 2024 हा कायद्या रद्द करावा अशी मागणी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग परभणी जिल्हाध्यक्ष मिन्हाज कादरी यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक विभाग पदाधिकारी यांनी परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे आज शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता केली आहे.