गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात शिरोळ तालुका भक्तिरसात न्हाऊन निघाले."गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलाल व फुलांच्या उधळणीने परिसर दुमदुमले.पटवर्धन संस्थान सरकारचा ऐतिहासिक दीड दिवसाचा गणपती तसेच राजवाडा,गणेश मंदिर,पाच मशिदी व सार्वजनिक मंडळात विधीवत मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी महिलांसह पुरुष भक्तांची लक्षणीय गर्दी उसळली होती.