आज दिनांक 9 सप्टेंबरला नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोशी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबाडा येथून एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याची घटना दिनांक आठ सप्टेंबरला बारा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. याबाबतीत मुलीच्या वडिलांनी दिनांक 8 सप्टेंबरला सायंकाळी चार वाजून सहा मिनिटांनी मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून, दाखल तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अंबाडा येथीलच युवका विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे