नवी मुंबई परिसराच्या सानपाडामधील जुईनगर रेल्वे स्टेशन परिसरातून एकदा एक व्हिडिओ समोर आला आहे. जुईनगर रेल्वे स्थानक येथे धावत्या लोकल ट्रेनमधून दरवाजावर लटकत तरुण स्टंटबाजी करत आहे. तसेच स्टंटबाजी करत असताना रेल्वे स्टेशन मध्ये असलेल्या मुलींना छेडण्याचा प्रयत्न देखील या व्हिडिओमध्ये करत असलेले पाहायला मिळत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर पोलिसांनी काही कारवाई केली आहे की नाही याबाबत अद्याप पर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही