शिरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निंभी येथे, जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयाच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी चैलीला दोरीच्या साह्याने गळफास लावून रोहित संजय इंगळे या युवकांनी आत्महत्या केल्याची घटना दिनांक 24 ऑगस्टला दहा वाजता चे दरम्यान उघडकीस आली आहे. शिरखेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळ पंचनामा कार्यवाही केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी मर्ग नोंद करून पुढील तपास सुरू आहे