तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे आज दि. 23 ऑगस्ट रोज शनिवारला सकाळी 11 वा. नागरिकांनी शासनाचानिषेध करीत डीजेच्या तालावर वाजत गाजत मारबतीची मिरवणूक काढली. बैल पोळा च्या दुसऱ्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढण्याची जुनी परंपरा आहे. मारबतीच्या मिरवणुकीत नागरिकांनी इळा पिळा टळो घेऊन जागे मारबत असे म्हणत शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, महागाई कमी करावी. अशा घोषणा दिल्या. या प्रसंगी चुल्हाड ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.