इचलकरंजी शहरातील रवींद्र कोंडेकर यांच्यावर शनिवारी करण्यात आलेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी आप्पा कलढोने (रा.कोरोची) याला पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.शनिवारी दुपारी पंचरत्न मंगल कार्यालयाजवळील कमानीजवळ रवींद्र आणि आप्पा हे दोघे मित्र एका परमिट रूम बियर बारमध्ये मद्यपान करून बाहेर पडले.यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला.या वादातून आप्पा कलढोने याने अचानक त्याच्याकडील धारदार चाकूने रवींद्र कोंडेकर यांच्यावर वार केले.यात रवींद्र गंभीर जखमी झाला होता.