लवादा गावाजवळ गुरुवारी सकाळी ११ अस्वलाचे अचानक दर्शन झाल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली.शेतात काम करण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांनी हे अस्वल जंगलाच्या कडेला फिरताना पाहिले.काही वेळातच गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळातच ही अस्वल जंगलाच्या दिशेने निघून गेली. याबाबत वनविभागाला माहिती दिली असता त्यांचे पथक तातडीने लवादा परिसरात दाखल झाले.वनविभागाकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.