शेवगाव तालुक्यातील दिवटे गावात सुरू असलेल्या मातोश्री ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत रस्त्याचं काम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.नरसोबा मंदिर ते धान्य वस्ती या एक किलोमीटरच्या रस्त्याच्या कामात नियमांचं उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकरी बापू साहेब जनार्दन जावळे यांनी केला आहे.जावळे यांचं म्हणणं आहे की शासनाच्या नियमानुसार कोणतेही रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी महसूल विभागाकडून मोजणी होऊन हद्दी निश्चित करणं बंधनकारक आहे मात्र या कामात अशी कोणतीही प्रक्रिया न करता थेट