नेरळ येथील ‘हलाल टाउनशिप’वर बंदीची मागकर्जतजवळील नेरळ येथे उभारण्यात येणाऱ्या ‘सुकून एम्पायर – हलाल लाइफस्टाइल टाउनशिप’ या धर्माधारित गृहप्रकल्पाला हिंदु जनजागृती समितीने तीव्र विरोध दर्शवून बंदीची मागणी केली आहे.पोस्ट ऑफिसजवळ आज झालेल्या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गोरक्षक दल, सनातन संस्था आदी संघटनांचा सहभाग होता. समितीचे म्हणणे आहे की, प्रकल्पाचा प्रचार केवळ मुस्लिमांसाठी होत असून तो संविधान, कायदा आणि सामाजिक सलोखा याच्या विरोधात आहे.