lलातूर-शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू होत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गांधी चौक व शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या वतीने भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. या संचलनात डी वाय एस पी समीरसिंह साळवे पोलीस निरीक्षक रंजीत रंजीत रेजितवाड, पोलीस निरीक्षक दिलीप सागर प्रमुख उपस्थित होते.संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गांधी चौक पोलिस ठाण्यापासून सुरू झालेले हे पथसंचलन बसस्टँड, गंज गोलाई, बाजारपेठ परिसर अशा महत्त्वाच्या रस्त्यांवरून निघाले.