आरवडे (ता. तासगाव) येथे राहत्या घरातील एका खोलीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. संग्राम राजाराम वाघ (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत संग्राम याचा चुलत भाऊ आशिष उत्तम पाटील (रा. वाघापूर) यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी २५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता फिर्यादी आशिष यांना संग्राम हा घरातील दुसऱ्या खोलीत जमिनीवर पालथा पडल्याचे दिसून आले. त्याची काहीच हालचाल दिसून येत नव्हती. आशिष आणि संग्रामची आई यांनी संग्रामला उताणे केले असता. त्या