बीड तालुक्यातील पोखरी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र समाजकंटकांनी जाणूनबुजून त्या बॅनरची विटंबना केली. मराठा समाजाच्या श्रद्धास्थानांचा अपमान केल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला तब्बल आठ दिवस उलटून गेले असले तरी अद्याप पोलिसांकडून कोणताही ठोस तपास लागलेला नाही. त्यामुळे संतप्त मराठा समाज रस्त्यावर उतरला.