सार्वजनिक आरोग्याची निकड आणि देशातील कोट्यवधी नागरिकांची गरज लक्षात घेऊन दृष्टी-बचत करणाऱ्या डोळ्यांच्या उपकरणांवरील जीएसटी आणि सीमाशुल्क माफ करण्याची शिफारस केली आहे. तसेच सहकारी आणि खाजगी क्षेत्रातील निवृत्त झालेल्या सुमारे ७८ लाख पेन्शनधारकांच्या मागण्यांची दखल घेण्याची विनंती आज दि १ ऑगस्टला १२ वाजता खासदार प्रतिभा धानोरकरसह शिष्टमंडळाची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन केली आहे.