तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेतील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता तारदाळ ग्रामपंचायतला भेट दिली.यावेळी त्यांनी योजनेची अडचणी आणि कामांचा तपशील घेतला.या योजनेसंदर्भात मागील तीन महिन्यांपासून अनेक ग्रामस्थांनी जनआंदोलन आणि तक्रारी केल्या होत्या.या मुद्द्यांवर गभीर दखल घेत माजी खासदारांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे विचार समजून घेतले.