शिरूर कासार तालुक्यातील शिंगारवाडी फाट्यावर ओबीसी बांधवांनी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून तीव्र घोषणाबाजी केली. अलीकडेच गेवराई येथे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला होता. आरोप करत शिंगारवाडी फाट्यावर ओबीसी बांधव एकत्र जमले. या वेळी त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून त्यांना पाठिंबा दर्शविला. तसेच, ओबीसी नेत्यांवर होणारे हल्ले तातडीने थांबवले नाहीत, तर हायवे क्रमांक 222 अडवण्याचा इशारा दिला