Download Now Banner

This browser does not support the video element.

जिल्ह्यात सर्वत्र बैलपोळा उत्साहात साजरा

Beed, Beed | Aug 22, 2025
बीड जिल्ह्यात सध्या ठिकठिकाणी बैलपोळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होत आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील जिवलग साथीदार असलेल्या बैलांचा गौरव व सन्मान करण्याचा हा दिवस असल्याने ग्रामीण भागात वेगळेच वातावरण पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपले बैल स्वच्छ धुऊन, रंगीबेरंगी कपडे, माळा व गोंडे लावून सजवले. अनेकांनी बैलांच्या शिंगांना तेल लावून सुंदर रंग चढवला. गावागावात महिलांनी पारंपरिक रांगोळ्या काढून बैलांना औक्षण केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us