युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन निनावे यांना दि. ९ सप्टेंबर रोजी भंडारा येथील बंगाली काॅलनी बुद्ध विहारच्या बाजूला २ दिवसांपासून गाय पडलेली आहे असा फोन आला. लगेच गोवर्धन निनावे यांनी पाहणी केली व डॉक्टरांना बोलावून त्या गायी वर उपचार करण्यात आले. नंतर ९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता दरम्यान युवा शक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांना बोलावून त्या गाईला गौरक्षण येथे नेवून सोडण्यात आले. यावेळी युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन निनावे, गौरव चोपकर, यश चिंचूलकर, बबलू खंडाईत उपस्थित होते.