मुंबईत मोठ्या गणेशोत्सव मंडळाचे गणरायाचे आगमन सुरू झाले आहे मात्र रस्त्यातील खड्डे जशाच तसे पहायला मिळत आहे आज विक्रोळी कन्नमवर नगर मधील रायगडाचा राजा या गणरायाचे आगमन आज शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजता मोठ्या उत्साहात झाले मात्र ज्या मार्गावरून या गणरायाचे आगमन झाले त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे चित्र पाहायला मिळाले यामुळे गणेश गणरायाची ट्रॉली खेचताना कार्यकर्त्यांना कसरत करावी लागली आता तरी पालिका खड्डे बुजवणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे