घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळात विराजमान असलेल्या गणरायाला उद्या निरोप दिला जाणार आहे. आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या दरम्यान शहरातील आसना नदी, पासदगाव, पुयनी ठिकाणी गणरायाच्या मूर्तिचे विसर्जन होणार आहे. विसर्जन स्थळाची महापालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे यांनी पाहणी केली. सहा पुटावरील श्रीच्या मूर्तीची पुयनी, झरी तलावात विसर्जन केले जाणार आहे. शिवाय छोट्या मुर्त्याचे विसर्जन कृत्रिम तलावात होणार असून प्रत्येक झोन मध्ये मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आले