पाटोदा तालुक्यातील राजुरी येथे आज भीषण अपघाताची घटना घडली आहे. विटा वाहून नेणारा टेम्पो अचानक पलटी झाल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत.शेतकऱ्याने डांबरी रस्त्यावर चर खोदून पाईपलाईन टाकली होती. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर तो रस्ता व्यवस्थित बुजवण्यात आलेला नव्हता. त्याच ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला होता. हा खड्डा अचानक दिसल्याने टेम्पो चालकाने जोरात ब्रेक मारला आणि वाहनाचा ताबा सुटून टेम्पो उलटला.