जालना जिल्ह्यात व शहरात दि. 6 सप्टेंबर, 2025 रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या विसर्जन मिरवणूक प्रसंगी विविध गणेश मंडळे प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे श्री गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणूक पाहण्यास आलेले लहान मुले, वयोवृध्दांच्या डोळ्यास इजा होवून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंगळवार दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी दु. 4 वा. आदेश देण्यात आले.