दिवानी व फौजदारी न्यायालय वडवणी जिल्हा बीड येथे सरकारी वकील म्हणून कार्यरत असणारे व्ही.एल चंदेल, राहणार इंदेवाडी परभणी यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्या प्रकरणी इंदेवाडी गावातील ग्रामस्थांनी आज गुरुवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन एक निवेदन देत वडवणी येथील सरकारी वकील व्ही एल चंदेल यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीकरून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.