इचलकरंजी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा राज्याभिषेक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. शहरातील शिवतीर्थ येथे आयोजित कार्यक्रमात पहाटे पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पारंपरिक पद्धतीने दुग्धाभिषेक करण्यात आला.यानंतर आमदार राहुल आवाडे व महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते आज शुक्रवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.