तालुक्यात व शहरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा हा बालगोपालांचा पोळा साजरा करण्यात येतो. शहरात विविध ठिकाणी तान्हा पोळा भरविला जातो. यावेळी बालगोपाल मातीचे लाकडाचे बैल सुंदर असे सजवून आणतात. यावेळी अनेक बालकांनी सुंदर असे देखावे सुद्धा तयार केले होते .बालगोपालांना त्यांच्या देखावे प्रमाणे पारितोषिक देण्यात आले. बालगोपालचा तान्हा पाहण्यासाठी शहरातील हजारो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अनेक व्यवसायिकांनी आपले दुकाने यावेळी थाटली होती.