भंडारा तालुक्यातील गोपेवाडा येथे जवाहरनगर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. ११ सप्टेंबर रोजी मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी विष्णू मकलवार वय ४९ वर्षे रा. गोपेवाडा या मटका बहाद्दराच्या ताब्यातून आकडे लिहिलेली सट्टापट्टी, १ डॉट पेन व नगदी ९९० रुपये असा एकूण ९९५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर जवाहर नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा जवाहर नगर पोलिसांनी तपासात घेतला आहे.