भंडारा येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील निरीक्षक माधव बारई व बालकामगार संदर्भातील संयुक्त कृती दलातील पथकाने दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान भंडारा येथील भारत टायर्स सूर्यकेतू नगर खोकरला खात रोड येथे धाड टाकली असता एका आरोपीने मोहम्मद समीर इस्माईल मंसूरी वय 16 वर्षे रा. सय्यदपुर राज्य बिहार याला काम करण्यास धोकादायकरित्या उद्योगात कामावर लावून मिळून आला. याप्रकरणी फिर्यादी माधव बारई यांच्या लेखी रिपोर्टरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.