राज्यातील महायुती सरकार कास्तकारांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत केला. सरसकट कर्जमुक्तीची मागणी प्रलंबित असल्याने महाविकास आघाडीच्या वतीने 15 सप्टेंबर रोजी नाशिक येथे भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. बेरोजगारी, महागाई, औषधांचा तुटवडा, 12 तास कामगार धोरण अशा अनेक मुद्द्यांवर