भंडारा जिल्ह्यातील चिचोली येथील सादोपाचे वय 23 वर्षे याची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला त्याच्या कुटुंबीयांनी उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दि. 26 मे रोजी आयसीयू विभागात दाखल करण्यात आले असता त्याचा दि. 26 मे रोजी दुपारी 3:30 वाजता दरम्यान उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला याचे कारण मात्र उघडकीस आलेले नाही.