धुळे जिल्ह्यात १५ ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान सर्व आश्रमशाळा व मदरशांमध्ये ५ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी काटेकोर नियोजनाचे निर्देश दिले. आरोग्य विभागाने शिक्षण, आदिवासी विकास व महिला बालकल्याण विभागाच्या समन्वयाने काम करावे, तसेच वैद्यकीय सुविधा, स्वतंत्र कक्ष आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.