जमावाला एकत्र करत पोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे मनीष काळजे यांच्यासह ६७ जणांवर सदर बाझार पोलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटे शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी रात्री सात रस्ता परिसरात घडली.