आज दिनांक 10 सप्टेंबरला दुपारी एक वाजता महाविकास आघाडीतील सर्व पक्षासह इतर संघटनेच्या वतीने, मोर्शी तहसीलदारांना निवेदन देऊन जन सुरक्षा कायदा विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या लोकशाही विरोधी भूमिकेचा निषेध नोंदवून, जन सुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली