भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला रोडवर दोन मोटरसायकलींची आपसात धडक झाली. त्यात गोंदिया जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान उघडकीस आली आहे. भारत रामटेके असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. तर अन्य एक जण अपघातात जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले आहे. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.