धुळे शहरातील साक्री रोडवरील जनरल अरुणकुमार वैद्य नगरात चोरट्यांनी दोन मंदिरांना लक्ष्य करून दानपेट्या फोडत १५ ते २० हजार रुपयांची रोकड लंपास केली. श्री विठ्ठल-रुक्मिणी व ओंकारेश्वर महादेव मंदिरात झालेल्या या धाडसी चोऱ्यांमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत संताप व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.