पुणे शहर : पीएमपी तसेच खासगी बस चालकांकडून ड्यूटीदरम्यान मोबाईलचा वापर वाढल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने कठोर नियम लागू केले आहेत. आता चालकांनी ड्यूटीवर जाताना मोबाईल वाहकाकडे जमा करावा लागणार असून ड्यूटी संपल्यानंतरच मोबाईल परत दिला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या नियमाला मंजुरी देण्यात आली. तरीही कोणी चालक मोबाईलवर बोलताना किंवा हेडफोन वापरताना आढ