मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालास हिरवा कंदील मिळाला आहे.' ट्रक्टेबल' या जगप्रसिद्ध संस्थेने हा प्रकल्प आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामास गती मिळणार आहे. दुष्काळ निर्मूलन आणि पूर नियंत्रण या दोन्ही बाबी समोर ठेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे.