सहज आणि प्रचंड नफा मिळेल, अशा खोट्या आमिषाला बळी पडत एका व्यापाऱ्याची तब्बल २८ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. अज्ञात गुन्हेगारांनी बनावट मोबाइल अॅप, व्हॉट्सअॅप ग्रुप व फसव्या संकेतस्थळाचा वापर करून संगणकीय तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत हा गुन्हा घडवून आणला.