फिर्यादी विजय विठ्ठलराव बेदेकर यांच्या तक्रारीनुसार नऊ सप्टेंबरला एमएच 49 बी झेड 3260 या क्रमांकाच्या लेलँड मालवाहू वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या म्हशीला धडक देऊन जखमी केले व पळून गेला.या प्रकरणी 10 सप्टेंबरला यवतमाळ ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.