वसईतील पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. व्यावसायिकावर खोटा गुन्हा दाखल करून त्याच्या मालकीच्या जमिनीचा ताबा दुसऱ्या व्यक्तीला दिल्याचा आरोप वाली पोलीस ठाण्यात साईनाथ संदेश राणे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांकडे तक्रार झाल्यानंतर जमीन व्यवहार प्रकरणात गैरवर्तन केल्याप्रकरणी राणे यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 आणि महाराष्ट्र पोलीस नियम 1956 च्या तरतीदीनुसार कारवाई करत तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.