तळसंगी शिवारात पत्राशेडमध्ये बांधलेल्या दोन गायी व एका खोंडाची एकूण ४३ हजार रुपये किंमतीची जनावरे अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, भारत नामदेव पवार (रा. मरवडे) यांची तळसंगी शिवारात शेती असून शेतातील पत्राशेडमध्ये त्यांनी एक गीर गाय, एक देशी गाय व एक खोंड बांधून ठेवले होते. दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी जनावरे सांभाळून ते मरवडे येथे परतले होते. दि. १ सप्टेंबर रोजी ते शेतात गेले असता जनावरे गायब असल्याचे दिसून आले.