बदलापूर येथील रस्त्यावर फ्रीस्टाइल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर गाव रोडवर ही घटना घडली असून दोन तरुणांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली आहे. पैशाच्या वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र हा सर्व प्रकार एका मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.