भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत संपूर्ण देशभर “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” राबविण्यात येत आहे. महिला ही कुटुंबाच्या आरोग्याची केंद्रबिंदू असून तिचे आरोग्य सुधारले तर कुटुंब, समाज आणि राष्ट्र सक्षम व सशक्त होते, या ध्येयाने हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश महिला, किशोरवयीन मुली व बालकांचे आरोग्य व पोषण मजबूत करणे, आजारांचे लवकर निदान करणे, जीवनशैली सुधारण्यासाठी जनजागृती करणे आणि रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांद्वारे आरोग्य सुरक्षितता बळकट करणे हा आहे.