राळेगाव तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे अशातच नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे, दिनांक 12 सप्टेंबर रोजी तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली, अशातच वडगाव गावाला लागून असलेला नाल्याला मोठा पूर आल्याने त्या पुराचे पाणी पूर्णतः गावात शिरून काही घरांचे तर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.