सध्या गणेशोत्सव सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन शिरूर कासार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी आवाहन केले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडा कोणीही मद्यपान करून गणेश उत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी होऊ नये, असा कोणी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, शांततेत सण उत्सव साजरा करावा, असे आवाहन जाधव यांनी केले. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरूर कासार शहरातून रूट मार्च देखील आज काढण्यात आला होता.