विदर्भ महसूल सेवक संघटना कोरची तालुक्याच्या वतीने आज दि. ११ सप्टेंबर गूरूवार रोजी सकाळी ११ ते सांयकाळी ५ वाजेदरम्यान तहसिल कार्यालय समोर एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.राज्य शाशनाचा महसूल यंत्रणेचा महत्वाचा घटक महसूल सेवक कोतवाल याना चतूर्थ श्रेणी कर्मचार्यांचा दर्जा प्रदान करण्यात यावा याकरीता संघटनेचा वतीने टप्प्याटप्याने आंदोलन करण्यात येत आहे.