समुद्रपुर: पोलिस स्टेशन व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने सण उत्सवा निमित्ताने अवैधदारू निर्मीती व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची मोहिम राबविली असता समुद्रपुर हद्दीतील मौजा गणेशपूर पारधी बेडा येथे धडक वॉशआऊट मोहिम राबविण्यात आली यावेळी याठिकाणी असलेल्या गावठी मोहा दारू, सडवा व साहित्य असा एकुण १५ लाख ८४ हजार ३०० रुपये किमंतीचा मुद्देमाल नष्ट केला.