शहरातील निमझरी नाका परिसरात रात्रीच्या वेळी दुकाने फोडून धुमाकूळ माजवणाऱ्या सराईत चोरट्यास शहर पोलिसांच्या डिबी पथकाने ६३ हजार रुपये रोख व घरफोडीचे साहित्यासह जेरबंद करीत उत्कृष्ट कामगिरी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात प्रसार माध्यमांना दिली.अरविंद प्रकाश बारेला रा.बंधारा ता.पानसेमल जि बडवाणी असे संशयीताचे नाव आहे.