शांतीचा व धार्मिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या महंमद पैगंबर जयंती आज शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कुरूंदवाड शहर व परिसरात दूध,सरबत,बुंदीचे वाटप सह अदि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी कऱण्यात आली. कुरुंदवाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बागवान फ्रेंड सर्कलतर्फे सपोनि रविराज फडणीस, मोहमेडन ट्रस्टचे अध्यक्ष हाजी अल्ताफ बागवान,शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, नगरसेवक उदय डांगे,जवाहर पाटील,माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजुगडे,राजू आवळे आदी उपस्थित होते.